25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; महेश सावंत यांच्यासह 5 अटकेत

0
592

प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आमची बाजू ऐकली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
महेश सावंत यांनी शिविगाळ केली आणि अंगावर धावून आले. सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या दरम्यान पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली असल्याची तक्रार तेलवणे यांनी केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, यशवंत विचले यांच्यासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.