पंकजा मुंडे नाराज आहेत का? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले…

0
778

पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा प्रश्न बावनकुळेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पंकजाताई नाराज नाहीत. माझ्यासोबत रोज बोलतात. परवा दोन तास त्यांच्याकडे जाऊन चर्चा करुन आलो. त्या आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचीव आहेत. मध्य प्रदेशमध्ये त्या सहप्रभारी आहेत,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पंकजाताईंनी आतापर्यंत कधी त्यांच्या एकाही स्टेटमेंटमध्ये भाजपाबद्दल किंवा भाजपाच्या विचारांबद्दल अथवा कार्यकर्त्यांबद्दल तसेच भाजपाच्या विचाराला पटणार नाही असं कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही,” असंही बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं. “पंकजाताई पूर्णवेळ पक्षाच्या कामात आहेत. त्या पूर्ण काम करत आहेत. त्या पक्षासाठी झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात ज्या कपोलकल्पित बातम्या बाहेर येत आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही बावनकुळेंनी व्यक्त केली.