एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेचे नाव मंगल सागर गिरी असे असून महामंडळाने या महिलेवर कडक कारवाई केली आहे.
सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे लोकांचं मनोरंजन तर होतंच, त्याचबरोबर अनेकांना यामुळे लोकांपर्यंत पोहचून प्रसिद्धीही मिळवता येते. सध्या सोशल मीडियावर रील्सचं प्रमाणही वाढत चाललं आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अगदी कमी वेळात म्हणजेच अवघ्या १५ ते ३० सेकंदामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये अनेक विनोदी, माहितीपूर्ण व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात.
रील्समुळे अनेकांना एक ओळख प्राप्त झाली आहे. यामध्ये केवळ सामान्य माणसंच नाही, तर शासकीय मंडळांमध्ये काम करणारे लोकही या रील्स बनवण्यात आघाडीवर आहेत. मात्र, एका महिला कंडक्टरला गणवेश घालून रील्स बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेचे नाव मंगल सागर गिरी असे असून महामंडळाने या महिलेवर कडक कारवाई केली आहे. या महिलेला मंडळाने निलंबित केले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंगलवर करण्यात आला आहे.