भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत स्पष्ट विधान केलं आहे.
तुम्हाला पुन्हा बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? असं विचारलं असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पालकमंत्री व्हायला आवडेल का? किंवा आवडणार नाही… हा मुद्दाच नाही. मी आता एका वेगळ्या मिशनवर चालली आहे. मी अलीकडेच दसरा मेळाव्यात जाहीर केलंय की, मी निवडणूक किंवा मंत्रीमंडळ विस्तार यावर काही बोलणार नाही. मला यावर कसलीही चर्चा करायची नाही आणि प्रसारमाध्यमांनीही तशी चर्चा करू नये, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.






