केंद्रिय कोळसा कदान व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गावच्या निवासस्थानी दिवाळी सण साजरा केला. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना देशातील विविध राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा दिली.
यावेळी राजकारणातल्या नेत्यांना त्यांनी विविध फटाक्यांची नावे दिली. राजकारणातला रॉकेट कोण? या प्रश्नाला क्षणभरात त्यांनी उत्तर दिले. राजकारणातला रॉकेट म्हणजे नरेंद्र मोदी, असे म्हंटले. अॅटमबॉम्ब कोण या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस असे उत्तर दानवेंनी दिले.
लड कोण आहे? या प्रश्नावरही दानवेंनी हटके उत्तर दिले. लड तर आता मनसेला म्हणता येईल. एकदा ते फुटायला लागले की, थांबातच नाहीत. त्यांच्याशिवाय लड कोणाकडेही नाही. सगळे सिंगल सिंगल झालेत आता. खाकी फटाका आवाज देणारा नेता म्हणजे शरद पवार, तर फुसका फटाका कोण? यावर ते म्हणाले की, शिवसेना आणि त्यांचे शिवसेनेचे नेते म्हणजे फुसका फटाका, असा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली.






