बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळात…

0
732

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांना खोचक टोला लगावला आहे.

पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाही तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते. बच्चू कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही, त्यांचा विश्वासघात झाला आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत मात्र बच्चू कडू यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.