राजकारण तापले ‌…नगरच्या उड्डाणपूलाचे शिवसेनेने केले उद्घाटन… व्हिडिओ

0
3490

नगर: शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे १९ नोव्हेंबर रोजी उद्घाटन होईल असे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले. मात्र आता या कामाच्या श्रेयातून राजकारण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारींनी आज उड्डाणपूलाची प्रत्यक्ष पाहणी करून उड्डाणपूलाचे उद्घाटन झाल्याचेही जाहीर करून टाकले. दिवंगत नेते अनिल राठोड व स्व.दिलीप गांधी यांची छायाचित्रे शिवसैनिकांच्या हातात पहायला मिळाली. शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, संजय शेंडगे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
विक्रम राठोड म्हणाले की, उड्डाणपूलासाठी अनिल भैय्या राठोड व दिलीप गांधी यांनी प्रचंड पाठपुरावा केला. त्यावेळी उड्डाणपूलाच्या कामाला कोणी विरोध केला हे नगरच्या जनतेला माहिती आहे. ९९ टक्के काम पूर्ण झाले असल्याने शिवसेनेच्या वतीने उड्डाणपूल खुला झाला असेही त्यांनी सांगितले.

व्हिडिओ क्रेडिट: विक्रम लोखंडे