केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवराय यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा वाद उफाळला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थाजवळ रावसाहेब दानवे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी केली. तर मराठा संघटनांही याप्रकरणात आक्रमक झाल्या आहेत.
भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवाजी" असा एकेरी उल्लेख.. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा. दानवेवर कारवाई करा. pic.twitter.com/PTwBhEzJpW
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022