नामांतर करायचे तर आधी १० हजार कोटींचा विकासनिधी आणा….

1
18

निजामशाहीच्या काळात राजधानी असलेल्या अहमदनगर शहराची तुलना कैरो बगदाद या सुंदर शहराशी होत असे. शहर विकासाचे नियोजन आदर्श समजले जाई. येथील खापरी नळ पाणी योजनेचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून अनेक येत असत. त्यामुळेच नामांतराची मागणी करण्यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी शहराच्या औद्योगिक, पर्यटन विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी मिळवून द्यावा, असे रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की महान व्यक्तिमत्वाची नावे या शहराला देण्याचा घाट घातला जात आहे. नक्की यामागे कोणता हेतू आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आहे की धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे? भूमिपुत्र असलेल्या नगरकरांना कोणी खिजगणतीत घ्यायलाही तयार नाही. या महान, आदर्श व्यक्तिमत्वाविषयी प्रत्येकाच्या मनात आदर व कृतज्ञतेची भावना आहे.

त्यांचे येथील मातीशी नाते आहे, हा या शहराचा गौरव आहे. खरेतर या महान व्यक्तीमत्त्वांनी लोकसेवेतून जगाला प्रेरणा दिली. त्यांचे योगदान आदर्श मानून वागल्यास गौरवशाली व्यक्तीमत्वांना, त्यांच्या स्मृतींना अभिवादन ठरेल. कोणतेही नामांतर करण्यापूर्वी या शहराचा चौफेर विकास करा. ज्यांची नावे या शहराला देणार आहात, त्यांचा खर्‍या अर्थाने यामुळे गौरव होईल. म्हणूनच नामांतराची मागणी करण्यापूर्वी कोणत्याही नेत्यांने शहराच्या औद्योगिक, पर्यटन
विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी मिळवून द्यावा. त्याचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष द्यावे. नगरकर तुमच्यापुढे नतमस्तक होऊन तुम्हाला वंदन करतील.

1 COMMENT

  1. नामांतर….. येलूलकर साहेबांनी योग्य मुद्दा मांडला कारण विकास हा मुद्दा महत्वाचा आहे .

Comments are closed.