राजीनामा न घेता मलिकांची खाती दुसऱ्या कडे सोपवणार, राज्यमंत्री तनपुरेंनाही पालकमंत्री करणार

0
835

मुंबई: सध्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांत्याकडील विभागांचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच्या बैठकीत घेतला आहे. या बरोबरच मलिक यांच्याकडील परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे, तर गोंदिया या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे,असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मलिक दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री राहिलेले आहेत. डिस्ट्रिट डेव्हलमेन्ट प्लानप्रमाणे काम होणं आवश्यक आहे, त्यामुले ही जबाबदारी इतरांनी द्यावी असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच अनिल देशमुखांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलंय. मलिकांची अटक चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे अशी आमची धारणा आहे, असे ते म्हणाले आहेत.