सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले …

0
21

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने कोणालाही अधिकृत उमेदवारी दिलेली नाही. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. नाशिक पदवीधरसाठी आम्ही भाजपतर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचा विचार करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पंरतु, मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नसून निवडणूक बिनविरोध होते की काय अशी शक्यता वर्तविली जात असून राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला नाशिक पदवीधरसाठी उमेदवार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.