विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र, अनावरण कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना डावलले!

0
31

बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे चिरंजिव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

23 जानेवारीच्या विधानभवनातल्या बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण होणार आहे. पण या कार्यक्रमाचे उद्धव ठाकरे यांचं नाव त्या पत्रिकेत नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे. शिवसेनाप्रमुखांचं तैलचित्र लावताय आणि उद्धव ठाकरेंना बोलवत नाही. ज्यावेळी आम्ही सावरकरांचं तैलचित्र लावलं होतं, त्यावेळी आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलावलं, त्यांचं नाव सुद्धा कार्डवर होतं. पण विधानसभा चालवत असताना कोणतीही प्रथा परंपरा पाळली जात नाही’, अशी नाराजीही संजय राऊतांनी बोलावून दाखवली.