महावितरण कडून वीज दरवाढीचा शॉक…३७ टक्के दरवाढ प्रस्तावित…

0
13

महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल 2020पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होऊ शकतात.

या अंतर्गत ‘महावितरण’ने भरमसाट दरवाढ प्रस्तावित केली आहे. या नवीन दरांनुसार, घरगुती ग्राहकांचा सध्या असलेला किमान दर 3.36 रुपये प्रति युनिटवरून 2023-24 साठी (एक एप्रिलपासून) 4.50 रुपये प्रतियुनिट होऊ शकतात. तर सध्याचा 11.86 रुपये प्रतियुनिट हा कमाल दर आता 16.60 रुपये प्रति युनिट प्रस्तावित आहे.

advt