आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2019 विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांना संख्या जास्त दिसताच. शरद पवार यांच्या चरणी सत्तेसाठी विलिन झाले. आम्हांला सत्तेचा मोह नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याच काम भाजपने केलं आहे. यावेळी बहुमत नव्हे तर 48 च्या 48 जागा जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.