खा.श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली…

0
23

खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे.