नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये असं काही लिहिलं आहे की त्यामुळं पेपर तपासणाऱ्यांना सुद्धा हसू की रडू कळायला मार्ग नाही. विद्यार्थ्यांनी उत्तरांऐवजी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. या व्यथा मांडत आम्हाला पास करा अशी विनंती विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली आहे. एक विद्यार्थिनीने सर मला कृपया पास करा, नाहीतर बाप लग्न लावून देईल असे म्हणत पास करा म्हणून विनंती केली आहे. दुसऱ्या एका विद्यार्थिनीने तर चक्क दोन पानी निबंध लिहीत मला घरी स्वयंपाक, धुनी भांडी करावी लागतात म्हणून अभ्यास करू शकले नाही. त्यामुळे किमान पास तरी करा अशी विनंती पेपरमध्ये केली आहे. दुसऱ्या एक मुलाने देवा मला पास कर पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकाला सद्बुद्धि दे अस लिहिलं आहे.






