सर्वोच्च न्यायालयाने फार ड्रास्टिक्ट डिसीजन दिला की, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे सत्र बोलावलं होतं, ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बोलावलं नव्हतं. त्यामुळे राज्यपालांचे आदेश चुकीचे आहेत, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तर सर्वोच्च न्यायालय स्टेट्सको अँटी निर्माण करू शकतं. म्हणजे आधीची स्थिती पूर्ववत करू शकतं. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.
टेट्सको अँटी ठेवण्याचा प्रकार यापूर्वी झालेला आहे. राष्ट्रपती राजवट लागू केली होती, ती रद्द ठरवली आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा बसवलं. हे आधी झालेलं आहे. हा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. पण ही भयंकर ड्रास्टिक स्टेज आहे. कोर्ट काय करतं ते बघू; असं उल्हास बापट यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
परेशन ऑफ पॉवर आपल्याकडे आहे. प्रत्येकाचे अधिकार संविधानाने दिले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा अर्थ लावला आणि 16 आमदार दोन तृतियांश होत नाहीत असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांना बंधनकारक राहील. त्यांना तसाच निर्णय घ्यावा लागेल, असं त्यांनी सांगितलं.






