आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रित लढवणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

0
25

राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल (4 जून) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे. राज्याच्या विकासासाठी आमची युती 11 महिन्यांपासून काम करत आहे. पुढच्या काळात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार आणि बहुमताने जिंकणार, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.