प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीमुळे ठाकरे गटाची प्रचंड कोंडी…

0
31

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवरून आता शिंदे गट आणि भाजपने थेट ठाकरे गटाला घेरलं आहे. प्रकाश आंबेडकरांची कृती ठाकरे गटाला मंजूर आहे काय? यावर ठाकरे गटाचं म्हणणं काय आहे? ठाकरे गट हिंदुत्व बाजूला ठेवणार आहे काय? असे सवाल या निमित्ताने भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाची प्रचंड कोंडी झाल्याचं दिसून येतं. आंबेडकरांच्या कृतीवरून विरोधक शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत आपल्या खास शैलीत उत्तर देतील आणि मोठी बातमी मिळेल असं सर्वांना वाटत होतं. पण राऊत हे काहीसे बॅकफूटवर दिसले. त्याला आम्ही उत्तर देऊ, अशी मोघम प्रतिक्रिया देत राऊत यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राऊत यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने ठाकरे गट बॅकफूटवर आलाय का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.