राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाला किती जागा? सर्व्हे नुसार भाजपला

0
18

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या, तर महाराष्ट्रामध्ये भाजपला 125 जागा मिळतील,’ असा अंदाज इंटरनेटवर पाहणी करून अचूक अंदाज वर्तविण्याबाबत ख्याती असलेल्या ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंचवीस जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के जनतेचा कौल आहे, असेही या पाहणीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला सतरा ते एकोणीस जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला असून, इतर पक्ष व अपक्षांना बारा जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.