‘विक्रांत’चे पैसे हडपणारा कोण….? मुलुंडचा चोर…

0
870

Shivsena…
आयएनएस विक्रांत बचाओ निधीचा अपहार केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा केला शिवसेनेने निषेध व्यक्त.
किरीट सोमय्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्या मुला सहित सामील असून तसेच आयएनएस विक्रांत बचाव नावाखाली महाराष्ट्रातील जनतेकडून जी वर्गणी गोळा करण्यात आली त्यात मोठी अफरातफर केलेली असताना, महाराष्ट्रातील शिवसेना नेते, खा संजय राऊत यांच्या वर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करायचे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना नेत्यांवर कट कारस्थान करून बदनामी करण्याचा जो कुटील डाव आखला आहे त्याचा नगरशहर शिवसेनेच्या वतीने बस स्टँड शिवाजी महाराज चौक येथे निषेध व आंदोलन करण्यात आले. ईडी भाजपचा घरगडी…विक्रांत चे पैसे हडपणारा कोण….? मुलुंडचा चोर…
अशा घोषणा देण्यात आल्या तसेच वाढती महागाई आणि बेरोजगारी कडे सुद्धा ह्या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले,
महागाई वाढती आहे मस्त, मोदी, शाह महाराष्ट्रात ईडी, इन्कम टॅक्स कारवाई करण्यात व्यस्त…
ह्या घोषणाही आंदोलनाच्या प्रसंगी देण्यात आल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्ते, युवासेना , नगरसेवक उपस्थित होते.