Radhabai kale college…
नगर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी – बारावीची परीक्षा होणार का? कशा होणार? असे अनेक प्रश्न निर्माण करत बारावीच्या ऑफलाइन परीक्षेची धाकधूक मनात ठेवतच परीक्षा दिली. शेवटी आज परीक्षेची धाकधूक संपली अन् विद्यार्थ्यांचा जल्लोष अनेक महाविद्यालयाच्या परिसरात सुरू झाला. येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मुलींनी हात उंचावून जल्लोष साजरा केला व सुटकेचा निःश्वास सोडला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शंकर थोपटे यांनी दिली.
या वर्षी बारावीच्या विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात ऑफलाईन शिकण्याचा आनंद कमी मिळाला असला तरी रयत शिक्षण संस्थेने व राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने अभ्यासक्रमाचे अचूक नियोजन व तयारी केल्याने मुली आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले असून घवघवीत यश संपादन करतील असा आशावाद केंद्र संचालक प्रा. सतीश शिर्के यांनी व्यक्त केला.
बारावीची परीक्षा सुमारे महिनाभर चालली होती आज शेवटच्या पेपरची घंटा वाजली आणि बारावीची मुली शेवटचा पेपर लिहून ‘हुश्श’ सुटलो एकदा बाबा’ असे उद्गार काढत बाहेर पडल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा गुरुवारी शेवटचा पेपर लिहून वर्षभर मेहनत घेणाऱ्या बारावीतील विद्यार्थिनींनी बाहेर एकच जल्लोष केला. हा आनंद सोशल मीडियावर झळकला. विद्यार्थ्यांनीचे चेहरे आनंदित झाल्याचे विविध महाविद्यालयांच्या आवारात दिसून आले. वर्गातील सखींची गळाभेट, शिक्षक – मैत्रिणी सोबत फोटो, सेल्फी काढत तर काहींनी कॅन्टीन मध्ये जाऊन थंड पेय व खाद्य पदार्थावर ताव मारत आनंद साजरा करत होत्या. पेपर सुटल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थीनी गटागटाने जमून गप्पा मारण्यात दंग झाले होते. आता आम्हाला सुट्टयांमध्ये काय प्लॅन करायचा त्याची अंमलबजावणी कशी करायची याचे वेध लागले आहेत असे कु. स्वाती लोणारे व कु. ईशा रोडे यांनी सांगितले.
आपल्या मैत्रीणी बरोबर कॉलेजचा निरोप घेतला. जीवनातील आयुष्याला कालाटणी देणारा क्षण म्हणजे बारावीची परीक्षा. शेवटचा पेपर झाला आणि या अभ्यासी पिंजऱ्यात बंद असलेल्या या मुलींनी सुटकेचा नि:श्वस टाकला. मागील दोन वर्षात जोडलेल्या मैत्रिणी, शिक्षक आता पहिल्या सारखे भेटणार नाहीत. कारण आता एका नवीन विश्वात आपण जाणार आहोत पण ज्याच्या सोबतीने इथपर्यत पोचलो ते दिवस पुन्हा भेटणार नाहीत. असा पुसटसा उदासिपणा देखील चेहऱ्यावर दिसत होता. एकीकीडे परीक्षा संपल्याचा आनंद तर दुसरीकडे महाविद्यालय व मैत्रिणी पासून दुरावण्याचे दुःख आहे. अशी भावना कु. अपूर्वा रणसिंग, कु.शीतल पाडळे, कु.निकिता दुस्सल,
कु. भावना निस्ताने, कु. ऋतुजा रेपाळे, कु.वैष्णवी धुमाळ, कु.सपना सोनवणे, कु.संतोषी खवळे, कु.
कु. आयेशा शेख, कु. संतोषी खवले, कु. सृष्टी हाडोळे यांनी व्यक्त केली.






