उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की, पवारसाहेबांना सत्य सांगावं लागलं. मला असं वाटतंय, मी काही जी गुगली टाकलीय, त्यात सध्या तरी त्यांनी सत्य बाहेर आलं आहे.
पण ते अर्धच सत्य बाहेर आलं. त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच क्लिन बोल्ड केलं आहे. पण ठीक आहे. लवकरच माझ्या आणखी एका गुगलीनं लवकरच पूर्ण सत्य बाहेर येईल. आणि तेही त्यांचे पुतणे अजित पवारच बोलतील असा पलटवार फडणवीसांनी पवारांच्या टीकेवर केला आहे.