अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठी गट रविवारी (ता. २ जुलै) राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर शिवसेनेत नाराजी असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. या नाराजीच्या चर्चांवर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.
आम्हाला बहुमताची गरज नव्हती, तरीही त्यांना का घेतलं. हाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला आहे. सगळे १७२ पर्यंत गेले असताना यांना घ्यायची गरज काय,असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला.
राजकारणात काही समीकरण बसवताना, म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, ही प्रत्येक माणसाची एक ताकद असते, पक्ष तर असतोच पण प्रत्येकाची एक व्यक्तीचीही एक ताकद असते.जे मंत्रिमंडळ झालं ते पाहून आमचेच कार्यकर्ते, अनेक प्रश्न विचारत आहेत. आता तुम्हाला काय मिळणार, याला त्याला काय मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत.






