खूनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांचा मृत्यू.,नगरसेवक शिंदेसह पाच आरोपींना अटक

0
46

अहमदनगर-जुन्या वादावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये नगरसेवक स्वप्निल शिंदेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि इतर सात ते आठ जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नगरसेवक स्वप्नील शिंदे सह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे