कोपरगावची जागा राष्ट्रवादीचीच.. भाजपच्या कोल्हेंनी काय करावे हा त्यांचा प्रश्न…

0
19

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यमान सदस्यांनाच तिकीट मिळणार असल्याने कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. भाजपला येथे जागा नाही. त्यामुळे माजी आमदार कोल्हे यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.कोपरगाव मतदार संघात आशुतोष काळे राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ. स्नेहलता कोल्हे भाजपात आहेत. त्यामुळे कोपरगावची जागा कुणाला यावरून मतदार संघात रणकंदन सुरू आहे.

आ. आशुतोष काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, परदेशात असताना अजित दादांचा फोन आला होता. कुठे आहे? विचारलं, मी त्यांना परदेशात असल्याचे सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली. विद्यमान आमदारांना तिकीट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार संघातील सर्वच विकास कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दादांनी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मदत केली होती. त्यामुळे अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो.