मुंबई: संजय राऊत यांच्या भाजपाचे साडेतीन नेते रडावर असल्याच्या विधानानंतर भाजपा नेत्यांकडून त्यांच्यावर टीका चालु आहे. भाजपाचे आचार्य तुषार भोसले उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन मागणी केली आहे. यात संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे. पत्रात आचार्य भोसले म्हणतात, पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु-संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.






