उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी व प्रखर मुलाखत…टिझर व्हिडिओ…

0
23

राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रखर मुलाखत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे घेणार आहेत. या मुलाखतीचा पहिला टिझर सोमवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर आज पुन्हा दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोमध्ये वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत, असं म्हटलं आहे.

मुलाखतीच्या टिझरमधील संभाषणात संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?, लोकशाही वाचणवणार का?, भाजपला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते?, यासह अनेक प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारलेत. तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिले असून ठाकरे अजून काय गौप्यस्फोट करणार हे मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर समोर येणार आहे.