हिंगणगाव सोसायटीवर माजी आमदार शिवाजी कर्डीले गटाचे वर्चस्व

0
944

निंबळक- हिंगणगाव ( ता. नगर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व तेरा जागा बिनविरोध झाल्या. विरोधी गटाचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी माघार घेतल्यामुळे हि निवड बिनविरोध झाली. या संस्थेवर माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाचे वर्चस्व स्थापन केले .
नगर तालुक्यातील हिंगणगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रामदास सोनवणे व पोपट ढगे यानी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयार केली होती .आमदार निलेश लंके गटानेही या पॅनल पाठींबा दिला . या निवडणुकीत सरपंचावर मतदाराची नाराजी दिसून आली यामुळे सरपंचाना माघार घेण्याची वेळ आली. सोसायटी बरोबरच आता ग्रामपंचायतीची सत्ता हि ताब्यात घेणार असल्याचे रामदास सोनवणे, पोपट ढगे यांनी यावेळी सांगीतले .विजयी उमेदवाराचे मा आ. कर्डीले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिनविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार एकनाथ झावरे, रंगनाथ दरदले, भाऊसाहेब सोनवणे, अनिल सोनवणे, ,दिलीप सिनारे , शिवदास त्रिंबके, बाबुलाल सय्यद, बाळासाहेब पानसरे, आचल सोनवणे, गयाबाई सोनवणे, संतोष सोनवणे, अर्जुन पाडळे, जनार्दन मदने स्वीकृत सदस्य संपत सोनवणे, रावसाहेब सोनवणे . निवडणुकीचे कामकाज सचिव विलास म्हस्के, अशोक लांडगे यांनी काम पाहिले . सर्व विजयी उमेदवाराना आमदार निलेश लंके यांनी शुभेच्छा दिल्या .