जयंत पाटील, तनपुरे अजितदादांबरोबर जाणार… पाटील यांनी घेतली अमित शहांची भेट…

0
26

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर आता आणखी एका भूकंपाची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. आज देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात असून यावेळी जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शहा आणि जयंत पाटील यांच्यात भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट अजित पवार यांनीच घडवून आणल्याचं सांगितलं जातंय.

जयंत पाटील हे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती आहे. सुमन पाटील , प्राजक्त तनपुरे हेसुद्धा जयंत पाटील यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. News 18 लोकमतने सदर वृत्त दिले आहे.