जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीच जिल्हाधिकारी कार्यालयात राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री अतुल सावे यांना अडवून शिवसैनिकांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळं तुम्ही पालकमंत्री झाल्याचं अतलु सावे यांना सांगितलं. पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. कामे मंजूर होत नसल्याने आणि नियोजन समितीतील कामावरून बाचाबाची झाली. भाजप सत्तेत कुणामुळे, शिवसेनेमुळे शिवसेनेमुळे अशी घोषणाबाजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,पंडित भुतेकर यांनी केली.
अर्जुन खोतकर यांनी यानंतर बोलताना जी सभ्यतेची भाषा असते मंत्री म्हणून ती पालकमंत्र्यांनी ओलांडली, त्यामुळे शिवसेनेकडून जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी हा प्रकार घडला, असे खोतकर म्हणाले.पालकमंत्री सतत अपमान करत असल्याची आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. पालकमंत्री अतुल सावे हे कामात दुजाभाव करतात हे सत्य आहे