तुम्ही कुठेही जा अगदी रस्त्यावरच्या दुकानापासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत आजकाल सगळीकडे हे डिस्पोजेबल कप सगळीकडे वापरले जातात. पाणी, चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयासाठी डिस्पोजेबल कपचा वापर अगदी सहज केला जातो. लास्टिक आणि रसायनांचा वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर तुम्ही दीर्घकाळ या कपचा वापर करत असाल तर कर्करोग होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की, डिस्पोजेबल कपमध्ये बिस्फेनॉल आणि बीपीए सारखी रसायने आढळतात. ही अत्यंत घातक रसायने आहेत. या कपमध्ये चहा किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील रसायने त्यामध्ये विरघळतात आणि ही रसायने पोटात पोहोचतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो.
डिस्पोजेबल कप बनवण्यासाठी केवळ रसायनांचा वापर केला जात नाही, तर मायक्रोप्लास्टिकचाही वापर केला जातो. त्यामुळे थायरॉईडसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने देखील कर्करोग होऊ शकतो. अल्कोहोल किंवा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये डिस्पोजेबल कप वापरल्याने कर्करोगाचा धोका खूप लवकर वाढू शकतो.