तुमच्या युतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा कराल?.. देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0
17

भारतातील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्था (आयएए) च्या वतीने मुंबईत आयएए लीडरशीप पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीसांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. ‘तुमच्या महायुतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा करता?’ असा प्रश्न विचारला.

तुमच्या युतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा कराल?

-तसं बघायला गेलं तर बरेच नेते आहेत, पण राजकारणात तुम्ही उघडपणे तसं सांगू शकत नाही. सध्या, जर तुम्ही म्हणालात की या पक्षातील हा नेता उत्तम आहे, तर लगेच तेवढ्या भागाचा व्हिडिओ कापून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, आणि म्हणतात, बघा देवेंद्र फडणवीस हे माझं किंवा माझ्या नेत्याचं आणि पक्षाचं कौतुक करत आहेत. हे माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. त्यामुळे आपल्या खाजगी गप्पांमध्ये मी तुम्हाला तीन नेत्यांची नावं सांगेन, ज्यांचं मला कौतुक वाटतं