राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये गुरूवारी जाहीर सभा झाली. या सभेत पवारांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. या सभेचा धुराळा खाली उडत नाही तोच आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सभेला प्रत्युत्तर द्यायला तयार झाले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आठ मंत्रीही २७ ऑगस्टच्या सभेला येणार आहेत.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर ही सभा होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मैदानाची पाहणी करुन सभेसाठीच्या विविध परवानग्या घ्यायलाही सुरुवात केली.






