Home सांस्कृतिक तू लग्न कधी करत आहेस? अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…

तू लग्न कधी करत आहेस? अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…

0
33

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. तर आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नेहमीच चर्चेत असते. तर आता ती लग्न कधी करणार याचं उत्तर तिने आहे आहे.

प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अनेक गुपितं सांगितली.
या सेशनच्या निमित्ताने प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा समावेश होता. या दरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की, “तू लग्न कधी करत आहेस?” त्यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, “मला माहित नाही.” असं लिहित तिने त्या उत्तराला हसण्याचाही इमोजी दिला.