आम्हाला ‘नथुराम’ व्हायला लावू नका… भुजबळांना मंत्रिपदावरून तातडीने हटवा…

0
30

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विद्येची देवता सरस्वती व ब्राह्मण समाजा विरोधात वक्तव्य केल्यानंतर त्यांना मंत्रि पदावरुन हटवण्यासाठी ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे यांनी थेट मंत्री भुजबळ यांना आव्हान दिले.

ते म्हणाले, ब्राह्मण द्वेशाची लाट पसरवून आम्हाला ‘नथूराम’ व्हायला भाग पाडू नका! सामाजिक परिस्थितीतून नथुराम तयार होतो. ब्राह्मण समाजाची विभत्सना करुन तुम्ही आम्हाला आक्रमक स्वरुप धारण करायला लावू नका, असे थेट आव्हान देत त्यांनी मंत्री भुजबळांना हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे बुधवारी नाशिकमध्ये भुजबळांच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. यावेळी ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ते म्हणाले, ब्राह्मण व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र मंत्री भुजबळांनी आखले आहे. बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. येत्या आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.