तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार आहात का? उद्धव ठाकरे म्हणाले, हो..उद्या जातो आणि शपथ घेतो…

0
28

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांची आज पत्रकार परिषद पार पडली. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांना ‘सामना’तून शरद पवार आणि अजित पवारांवर टीका का केली जाते? असा रोखठोक प्रश्न विचारण्यात आला.

आमचं वैशिष्ट आहे, आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. भाजपसोबत असताना भाजपवर टीका करायचो”, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हो, बरोबर, उद्या जातो, शपथ घेतो”, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचा संयोजक कुणाला ठरविण्यात येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन दिवसांनी बैठक पूर्ण झाल्यावर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.