राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे अडीच वाजताच जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या 8 सप्टेंबरमध्ये जालन्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अडचण आली असती म्हणून हे आंदोलन दडपण्यात आले, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. गृह विभागाकडुन आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, जालन्यातील आंदोलन पोलीस प्रशासनामुळे चिघळले, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
Home ब्रेकिंग न्यूज गृह विभागाकडुन आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो…आ.रोहित पवार यांचे वक्तव्य..