लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात पाय ठेऊ देऊ नका…राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांशी संवाद

0
29

अंतरवाली सराटी झालेल्या लाठीमार आणि गोळीबार प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यात आले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना राज ठाकरे यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कुणी दिले?, असा सवाल विचारला. शिवाय हे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला, असं राज ठाकरे म्हणाले.

मराठा समाज या आधीही जेव्हा आरक्षणासाठी मोर्चे काढत होता. तेव्हाही मी सांगत होतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे लोक फक्त तुमचा वापर करतील मतं पदरात पाडून घेतील आणि तुम्हाला विसरून जातील. कधी हे सत्तेत तर कधी हे विरोधी पक्षात… विरोधातले मोर्चे काढणार आणि हेच पुन्हा सत्तेत आले की गोळ्या झाडतात. पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश ज्यांनी दिले त्यांना दोष द्या. त्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा आज 7 वा दिवस आहे. मनोज जरांगे यांचं जलत्याग आमरण उपोषण सुरूच आहे.