राज्य सरकारने मराठा आरक्षणसाठी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना शासन निर्णयाचं पत्र दिलं. मात्र यात त्यांनी बदल सुचवले आहेत. जीआरमध्ये सुधारणा झाल्यावरच उपोषण सोडणार, असं त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, हा कालचाच जीआर आहे. यात सुधारणा आहेत, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवं. तसेच जीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवणार, असं ठरलं आहे.
चर्चेसाठी जरांगे यांनी मुंबईला यावे, असं अर्जुन खोतकर म्हणाले. यासाठी हवं तर हॅलिकॉप्टरचीही व्यवस्था करू. यावर मनोज जरांगे म्हणाले, ”तुम्ही ते तीन शब्द बदलून आणले तर आम्ही हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करू