अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डिंग अॅप किंवा थर्ड पार्टी अॅप आवश्यक आहे. विशेष म्हणजे अँड्रॉइड १० नंतरच्या नवीन मोबाइल फोनमध्ये बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डर असतो.
तुमच्या फोनचा स्क्रीन रेकॉर्डर डॅशबोर्ड क्विक सेटिंग मेनूमधून ओपन करा.
सेटिंग्स आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर मायक्रोफोन ऑडियोसह स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा.
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करण्यापूर्वी किंवा सुरु असताना रेकॉर्ड बटन वर क्लिक करा आणि रेकॉर्डिंग संपल्यावर बंद करा.
जर तुमच्याकडे स्मार्टफोनमध्ये बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डर नसेल तर Google Play स्टोरवरून XRecorder किंवा Screen Recorder इत्यादी थर्ड पार्टी स्क्रीन रेकॉर्डिंग अॅप डाउनलोड करता येतील.