Video: बर्निंग कारचा थरार! अपघातानंतर गाडी पेटली; ३ मित्रांचा मृत्यू

0
24

राजस्थानच्या अजमेरमध्ये भरधाव कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडीने पेट घेतला, ज्यामध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. शनिवारी (१६, डिसेंबर) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमधील अजमेर शहरात शनिवारी रात्री भयंकर अपघाताची घटना घडली. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली क्रमांकाची भरधाव कार झनाना रोडवरील डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे पाहताच स्थानिक लोकांनी धाव घेत गाडीच्या काचा फोडून तरुणांना बाहेर काढले.

अपघातावेळी गाडीमध्ये पाच जण होते. ज्यामधील दोघांचा गाडीतच मृत्यू झाला होता. तर एकाचा उपचारासाठी नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोघांना सध्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.