मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा झाली आहे. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत अशोक सराफयांचं अभिनंदन केलं आहे.
अशोक सराफ यांचं अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. अशोक सराफ यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.