निवडणूक आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” हे नाव शरद पवार गटाला देण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच आता अजित पवार गटाला अलिबाबा चाळीस चोर, असे नाव देणार का? अशी टीका केली.
जितेंद्र आव्हाड पवारांच्या घरात आग लावत आहे’, असे विधान काल एका नेत्याने केले. यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, “मी आग लावण्याचे धंदे करत नाही. मी जर काही चुकीचे केलं असतं तर शरद पवारांनी माझा कान केव्हाच पकडला असता. उलट तुमच्या नादाला लागून पुतण्या (अजित पवार) खराब झाला. कारण तुमच्या रक्तातच ते होतं. जे माझ्या विरोधात बोलले, त्यांचे मी नावही घेणार नाही. तुम्ही तुमच्या बहिणीला, काकाला किती त्रास दिला. हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहीत नसेल पण परळीतल्या गावागावात माहीत आहे.” जितेंद्र पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर घरात आग लावण्याबद्दल टीका केली होती. या टीकेला उत्तर देत असताना आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.