अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे गेले त्यावेळीच चव्हाणांचीही काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आज त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
BJP ने आमची कितीही लोकं फोडण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सांगतो की, यांच्यापेक्षा जास्तीच्या 10 जागा माविआ जिंकेल. जागावाटपाच्या फॉर्म्यूलावर जवळपास सर्व चर्चा झाली आहे. आमचं टार्गेट BJP संपवणं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.