Video: कपडे इस्त्री करण्यासाठी महिलेचा अनोखा जुगाड, क्षणांत होईल काम

0
18

कपड्यांना इस्त्री करण्यासाठी आपल्याला नेहमीच विजेची गरज पडते. पण आता लाईट नसेल तरीही कपड्यांना इस्त्री करता येणार आहे. एका महिलेने कपडे इस्त्री करण्यासाठी आगळीवेगळी युक्ती वापरली आहे. त्यामुळे तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतंय की, कुकर इंडक्शनवर ठेवला आहे. त्याच्याजवळ एक महिला उभी आहे.
कुकरची शिट्टी वाजताच ती महिला इंडक्शनवरून कुकर उचलते आणि पळून जाते. ती बेडरूममध्ये पोहोचते आणि कुकरच्या मदतीने शर्ट इस्त्री करू लागते. महिलेची हा जुगाड इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @Babymishra_ या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.