मतदारसंघांच्या सर्वेक्षणांचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या खासदारांचे तिकीट कापण्याच्या भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर बुधवारी ओढवली. पाटील यांच्यासह यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली असून नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवरूनही मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे.
भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून तिकीट मिळणार आहे. राजश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ आहे.
Home ब्रेकिंग न्यूज भाजपच्या हट्टामुळे मुख्यमंत्री शिंदे हतबल…पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळींचा पत्ता कट…