Friday, May 17, 2024

अहमदनगर पाटबंधारे विभागातील २ महिला अभियंता ‘एसिबीच्या’ जाळ्यात

अहमदनगर-पाटबंधारे विभागाचे दोन महिला अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.नगरच्या पाटबंधारे संशोधन व निःस्सारण विभागातील एक व याच विभागातील नाशिक येथील दुसरी महिला अधिकारी असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. लाचेचा पहिला हप्ता घेतांना रंगेहाथ पकडले आहे. रुथिया मोहम्मद हनिफ शेख (वय ३५, सहायक अभियंता, वर्ग -१, रा. निर्मल नगर, अहमदनगर), रजनी पाटील (कार्यकारी अभियंता, वर्ग१ नाशिक रोड) अशी कारवाई झालेल्या महिला अधिकाऱ्याऱ्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: राहुरी तालुक्यातील उंबरे येथे पूर्ण झालेल्या एका कामाचे १८ टक्क्यानुसार एक लाख ३९ हजार ५०० रुपये लाच म्हणून तक्रारदार यांना मागण्यात आले होते. तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे (ता. राहुरी) येथील पूर्ण झालेल्या कामाचे पावणे आठ लाखांचे देयक पूर्ण केल्याच्या बदल्यात शेख यांनी स्वतः साठी ८ टक्के व पाटील यांच्यासाठी १० टके अशी एकूण १८ टक प्रमाणे एक लाख ३९ हजार ५०० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.

या तक्रारीची शहनिशा झाल्यानंतर अहमदनगर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये स्वीकारताना शेख यांना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, राधा खेमनर, सना सय्यद, हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles