बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात प्रितम मुंडेही दिसत आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली म्हटल्यानंतर प्रितम यांच्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. मात्र तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी डॉ. प्रीतम मुंडे यांनी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली आहे.