पिंपरी – शहराच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात सेक्स रॅकेट चालवले जात आहे. व्हाट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तिघांचा विरोधात पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने भांडाफोड केली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमधील तरुणीनीची सुटका पथकाने केलीआहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली आणि छत्तीसगढ येथील तरुणींची समावेश होता.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक सातत्याने शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. चिंचवड येथील कामिनी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामध्ये पीडित तरुणीचे व्हाट्सॲपवर फोटो पाठवून वेश्या व्यवसाय केला जात होता. समोरील व्यक्तीला ज्या मुलीचा फोटो आवडेल तिला जबरदस्तीनं हॉटेलमध्ये पाठवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. कामिनी हॉटेल मधून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. यामधील पीडित तरुणीची सुटका करण्यात आली.






